Alternate Text

महायोग महाशिवरात्र

महायोग महाशिवरात्र


महाशिवरात्री निमित्त सर्व शिव भक्तांना हार्दिक शुभेच्छा....!!ॐ नमः शिवाय ..ॐ नमः शिवाय.! !


यंदाची महाशिवरात्र खास असण्याची ही कारणे?

असा योग १२ वर्षांनंतर येईल?

यंदाची महाशिवरात्र सोमवार दिनांक ७ मार्चला दुपारी १.२० वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०.३३ मिनिटांपर्यंत असेल.

यंदाची महाशिवरात्र विशेष असेल कारण यंदा भगवान शंकरांच्या सोमवारी त्रयोदशी आणि चतुर्दशी अशा दोन्ही तिथी येणार आहेत.

याच दिवशी शुभ योग तसेच पंचग्रह, ग्रहण तसेच कालसर्प योगही येणार असल्याने ग्रहशांतीचा लाभही मिळणार आहे.

भगवान शंकर हे तंत्राचे महादेव आहेत. म्हणून तंत्राच्या चार रात्रींपैकी एक रात्र महाशिवरात्र म्हणून साजरी केली जाते. यंदा मार्च महिन्यात ही रात्र महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाणार आहे.

तंत्रांमध्ये अशा अनेक साधना असतात ज्या केवळ रात्रीच्या वेळेसच केल्या जातात. ही साधना करणे हे इतर अनेक साधना करण्यापेक्षा कित्येक पटीने लाभदायी आणि फलदायी असते.

याच दिवशी शिवज्योती प्रकट झाली होती आणि शिव पार्वती यांचा विवाहसुद्धा झाला होता.

असा योग फलदायी!

यापूर्वी २०१२ मध्ये महाशिवरात्रीचा योग सोमवारी आला होता. आता पुन्हा चार वर्षांनी तो आला आहे. यापुढे २०२८ साली महाशिवरात्री सोमवारी येणार आहे. सोमवारी येणाऱ्या महाशिवरात्रीचा योग फलदायी असतो. याचे कारण चंद्र, राहू आणि केतू हे ज्यांच्यासाठी वाईट स्थानात आहेत त्यांच्यासाठी भगवान शंकरांची आराधना फलदायी असणार आहे.

सोमवार हा दिवस महादेवाचा मानला जातो. यंदा शिवरात्री सोमवारी आल्याने अधिक फलदायी महाशिवरात्री मानली जात आहे. हिंदू ग्रंथानुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुदर्शीला मध्यरात्री आद्यपरमेश्वर शिवलिंगच्या रूपात प्रकट झाले होते. काही विद्वान पंडीत या शुभकाळाला शिव-पार्वती विवाह तिथी मानतात. तर काहीच्या मते या रात्री भोळ्या शंकराने विषप्राशान केले होते. आध्यात्मात जीव आणि शिवाच्या मिलनची रात्र असा उल्लेख आला आहे.

महाशिवरात्रीच्या दिवशी नदीवर स्नान करून शिवलिंगवर रुद्राभिषेक करून विधीवत पूजा केली जाते. पूज करताना एक लक्ष, एक हजार किंवा एकशे आठ बेलपत्र अर्पण केली जातात. दिवसभर उपवास करावा तर रात्री शिव भजनात जागरण करावे. महाशिवरात्रीच्या दिवशी महादेव मंदिरात सकाळी ब्रह्म मुहूर्तापासून रात्रीच्या शेवटच्या प्रहरापर्यंत ‍वेगवेगळे कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्यात रुद्राभिषेक, भस्म आरती, जलाभिषेक तसेच सुका मेवा, हलाव्याने शिवलिंगाचा श्रृंगार केला जातो.

महाशिवरात्री व्रताचे महत्त्व आणि व्रताचा विधी

एमपीसी न्यूज- शिव ही सहज प्रसन्न होणारी देवता असल्यामुळे शिवाचे भक्त पृथ्वीतलावर मोठ्या प्रमाणात आहेत. महाशिवरात्र हे शिवाचे व्रत असून या व्रताचे महत्त्व, व्रत करण्याची पद्धत आणि महाशिवरात्र व्रताचा विधी या विषयीची माहिती खालील लेखातून जाणून घेऊया.

तिथी : महाशिवरात्र हे व्रत माघ वद्य चतुर्दशी या तिथीला करतात.

देवता : महाशिवरात्र हे शिवाचे व्रत आहे.

महत्त्व :महाशिवरात्रीच्या या दिवशी शिवतत्त्व नेहमीपेक्षा 1 हजार पटीने कार्यरत असते. शिवतत्त्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यासाठी महाशिवरात्रीला शिवाची भावपूर्णरित्या पूजाअर्चा करण्यासह " ॐ नमः शिवाय " हा नामजप जास्तीतजास्त करावा.

महाशिवरात्र व्रत करण्याची पद्धत :उपवास, पूजा आणि जागरण ही महाशिवरात्र व्रताची तीन अंगे आहेत.

महाशिवरात्र व्रताचा विधी :माघ कृष्ण त्रयोदशीला एकभुक्त रहावे. चतुर्दशीच्या दिवशी सकाळी महाशिवरात्र व्रताचा संकल्प करावा. सायंकाळी नदीवर किंवा तळ्यावर जाऊन शास्त्रोक्त स्नान करावे. भस्म आणि रुद्राक्ष धारण करावे. प्रदोषकाळी शिवाच्या देवळात जावे. शिवाचे ध्यान करावे.मग षोडशोपचारे पूजा करावी. भवभवानीप्रित्यर्थ तर्पण करावे. शिवाला एकशे आठ कमळे किंवा बेलाची पाने नाममंत्राने वहावीत. मग पुष्पांजली अर्पण करून अर्घ्य द्यावे. पूजासमर्पण, स्तोत्रपाठ आणि मूलमंत्राचा जप झाल्यावर शिवाच्या मस्तकावरील एक फुल काढून ते स्वतःच्या मस्तकावर ठेवावे आणि क्षमायाचना करावी.

यामपूजा :शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्यात, असे विधान आहे. त्यांना ‘यामपूजा’ असे म्हणतात. प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंगस्नान घालावे, अनुलेपन करावे, तसेच धोत्रा, आंबा आणि बेल यांची पत्री वाहावी. तांदुळाच्या पिठाचे 26 दिवे करून त्यांनी देवाला ओवाळावे. पूजेच्या शेवटी 108 दिवे दान द्यावेत. प्रत्येक पूजेतील मंत्र वेगवेगळे असतात, त्यांनी अर्घ्य द्यावे. नृत्य, गीत, कथाश्रवण इत्यादी गोष्टींनी जागरण करावे. पहाटे स्नान करून पुनश्च शिवपूजा करावी. पारण्याला ब्राह्मणभोजन घालावे. आशीर्वाद घेऊन व्रतसमाप्ती करावी. बारा, चौदा किंवा चोवीस वर्षे हे व्रत केल्यावर त्याचे उद्यापन करावे.

ॐ त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रयायुधम्।
त्रिजन्मपापसंहारं बिल्वपत्रं शिवार्पणम्॥
ॐ मूलतो ब्रह्मरूपाय मध्यतो विष्णु-रूपिणे।
अग्रतः शिव-रूपाय बिल्वपत्रं शिवार्पणम्॥

posted on 07-Mar-2016