॥ नित्य आरती – १ ॥
करोनी तयार चिंध्यांचा मुकुट शोभत ।
आरती ओवाळिता पाहू प्रत्यक्ष भगवंत ॥ध्रु॥
सुतळीच्या गाठी मारीली तेचि माळ हातात ।
क्षणभर ठेविली त्यांनी आपल्या गळ्यात ॥१॥
देवा यशवंता तुमच्या लीला ।
मी आहे तुमच्या जवळी झाडाचा पाला ॥२॥
सद्गुरु यशवंताने दिली असे एक पिंडी ।
यशवंताचा महिमा गाजो पिंडी ब्रह्मांडी ॥३॥
अवतरलाशी तू धर्मा ग्लानी मिटवाया ।
नास्तिकांच्या वागण्याचा बदल करोनिया ॥४॥
आरती ओवाळिता यशवंताचे रुप पाही ।
लीन होऊनी बाळ तुमच्या चरणाशी राही ॥५॥
॥ यशवंत हो ॥ जयवंत हो ॥
