सहा वर्षांपूर्वी माझे मित्र अमृत पाटील यांचेबरोबर सिद्धेश्वर कुरोली येथे सदगुरू यशवंत बाबांच्या समाधीचे दर्शन घेणेचा योग आला. आणी मी या दर्शनाने भारावून गेलो. आणी तेव्हापासुन मला जमेल तेव्हा बाबांच्या दर्शनाला कुरोलीस यायला लागलो. व मी बाबांचा भक्त झालो. तेव्हा पासून माझे लक्षात अशी एक गोष्ट आली की एखादे काम मला अवघड वाटायचे होईल का नाही होणार परंतु बाबांचे आशीर्वादाने माझे अपेक्षे पेक्षा चांगल्या पध्दतीने माझी आयुष्यातली महत्वाची कामे झाली आहेत. बाबांचा कृपा आशीर्वाद माझेवर व माझे कुटूंबावर सदैव राहो. येवढीच सदगुरू चरणी प्रार्थना. ॥ यशवंत हो जयवंत हो ॥
आम्ही बोर पाडण्याचे ठरवले होते . परंतू १० बोर गाडी वाले ती जागा बगून गेले परंतु तिथे बोर पाडण्यास कोणच तयार होत नवते शेवटी औंध च्या एका बोर वाल्याला संपर्क केला तो आला त्याने जागा पाहिली बाकी सगळ्या प्रमाणे तो सुद्धा नाही बोलला कारण जिथे बोर घेणार होतो ती जागा खूप अडचणीत होती …। पानाड्याला दुसरी जागा दाखवा बोललो तर त्याने नकार दिला ……. मग यशवंत हो जयवंत हो चा जप केला तसेच थोडे नामस्मरण केले आणि दुसऱ्या दिवशी वडूज च्या गोडसे बोरवेल्स वाल्याचा फोन आला आणि तो मशीनच घेऊन आला आणि त्यांच्या मशीन वर लिहले होते कि यशवंत हो जयवंत हो ………. आणि पाणी सुद्धा खूप लागले ……. आज त्याच पाण्यावर आम्ही शेती करत आहोत ……. यशवंत हो जयवंत हो खरच या जप केल्याने शरीरात एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते ……. आपल्याला असाध्य वाटणारी गोष्ट साध्य होते …….
१९९७-९८ च्या सुमारास आम्ही कुरवलीला यशवंत बाबांच्या दर्शनाला गेलो होत. मे महिना होता, ऊन रणरणत होते. तशातच मुंबईचे लेले काकातिकडे होतेच. त्यानी सांगितले की इकडे दुपारचे नुसतेच बसून रहाण्यापेक्षा तुम्हीऔंध येथे जाऊन या . तिकडे राजा रवी वर्मांची ओरिजिनल पेंटिंग्स आहेत. आमची वरात भरउनात माळराना वरून एस.टी. स्टॉप वर जायला निघाली.बरोबर पत्नी, ३ वर्षाची माझी मुलगी. मनात विचार आला की आत्ता कुणीतरी एम ८० गाडी आणून दिली तर (कारण त्यावेळी मला तीच गाडी चालवता येत होती) भर उन्हाची दगदग तरी वाचेल.२-३ मिनिटे चाललो असेन नसेन समोरून यशवंत महाराजांच्या शिष्यांपैकी एकजण एम ८० वरून आला. त्याने स्वत:हून विचारले की तुम्हाला एम ८० गाडी चालवता येते का? मी हो म्हंटले, तो म्हणाला, घेऊन जा. मी आश्चर्याने मुग्ध होऊन पहातच राहिलो. कुणाची ही लीला? कोण करता करविता? मनात विचार आला, की ज्याला मुंगीच्या मनातले मनोगत ओळखता येते, त्याला काय अशक्य आहे. ती गाडी घेऊन मी २-३ तासात परत आलो. ज्याची होती त्याला परत केली, मोबदला घेत नव्हता म्हणून पेट्रोल टाकी पुर्ण भरून परत केली. यशवंत महाराजांच्या कृपेने मी दंग झालो.धन्य ते सद्गुरू आणि त्यांचे शिष्य. नमस्कार माझा त्या यशवंत माऊलीला.
Yashvant ho jayvant ho!!!!! Ram Krishna harii !!!!! Yashvant ho jayvant ho!!!!! Ram Krishna harii !!!!! Yashvant ho jayvant ho!!!!! Ram Krishna harii !!!!!
sadguru sarikhe nahi devat sadguru haa devancha dev
Yashvant ho jayvant ho!!!!! Ram Krishna harii !!!!! Yashvant ho jayvant ho!!!!! Ram Krishna harii !!!!! Yashvant ho jayvant ho!!!!! Ram Krishna harii !!!!!
जेव्हा मी मित्रासोबत सिद्धेश्वर कुरोलिला आलो तेव्हा रात्रि महाराज त्यांच्या घराच्या बाहेर कंदील घेउन बसले होते तेव्हा इनामदारानी एका घरात झोपायची व्यवस्था केलि सकाळी उठून त्यांच्यासोबत गणपति मंदिरात गेलो तेथून त्यांच्या घरी त्यानी लिम्बू सरबत पाजले तेथून परत येवून झोपलो संध्याकालचे 5.30 वाजले मित्राना उठवले आणि बाबा जिथे बसले होते तिकडे आलो लाम्बुन दर्शन घेतले बाबा उठले जवळजवळ 200 मीटरवर बाबा असतील मी मित्राना म्हणालो स्वामिनी आपल्यासाठी बाबाना थांबवले तेव्हा महराजानी पाठी वळुन बघितले आणि म्हनाले होय मीच तुमचा स्वामी समर्थ तेव्हापासून बाबावर जी श्रद्धा जडली ती आजतागायत आहे ।। जय यशवंत बाबा ।।