यशवंत हो जयवंत हो देवस्थान ट्रस्ट कुरोली, ता: खटाव, जि. सातारा
श्री परमहंस यशवंत बाबा महाराज सिद्धेश्वर-कुरोली , ता.खटाव , जिल्हा सातारा. यांची माहितीपट चित्रफीत बाबा भक्त मा. प्रा.श्री अनिल माने (सर) व मा.श्री. विनायक खाडे (साहेब) यांनी तयार केली आहे .
देव आणि गुरु नका भेद करू ।
बावुगाची शीण नका मनी धरू ।। धृ . ।।
पोर्णिमेसी जातो अंबाबाईसी ।
सोमवारी भजतो श्री शंकरासी ।
तोचि ब्रह्मा, तोचि विष्णू अर्धनारी नटेश्वरू ।।१।।
भुकेल्यांना अन्न तहानलेल्यांना पाणी ।
यशवंत होई माझा तेव्हा चक्रपाणी ।
सुख शांती मोक्षाचा नका विचार करू ।।२।।
आकाशातून पडते पाणी अंती सागराशी ।
ब्रह्मा विष्णू महेशाचे रूप माझा गुरु ।।३।।
गुरु थोर कि देव थोर म्हणावा असा प्रश्न बहुतेक भक्तांच्या मनामध्ये उभा राहतोच . पण देव दाखवणारा गुरूच असतो . नव्हे नव्हे गुरु हाच देव असतो . त्यामुळे गुर व देव हा भेद न करता सर्वस्व गुरुला अर्पण करावे . बहुतेक भक्त वाराप्रमाणे भजत असतात . कोणी पौर्णिमेला अंबाबाईला जातात. तर काही सोमवारी शंकराला जातात . पण सद्गुरूच्या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू , महेश हि रूपे समाविष्ट असतात .
माझा सद्गुरु भुकेल्यांना व तहानलेल्यांना पाण्याची गरज असते. त्यावेळेस माझा सद्गुरु यशवंतबाबा हातात चक्र तयार असतो . सद्गुरु असेल तर तुम्ही सुखाचा, शांतीच व मोक्षाचा विचार करू नका. कारण त्याच्याजवळ सर्व काही आहे .
आकाशातून पडणारे पाणी शेवटी सागरामध्ये समाविष्ट होते . त्याप्रमाणे मी कोणत्याही देवाला नमस्कार केला तरी शेवटी तो माझ्या सद्गुरु यशवंत बाबांलाच मिळतो . असा माझा सद्गुर यशवंत ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे रूपच आहे.
१. साधु आले श्री दर्शना
धाडीले कुमठेकरांच्या घरा
सांगे बांधण्यास पार
घराजवळील पाहूणी औंदुबर
२. गोष्ट ही पाटील
घालती बाबांच्या काना
दिला उशाचा काढूनी
दगड पार आरंभण्या
३. आनंदराव शिखऱ्यांना श्रींनी
लाविले विहीरीतूनी आणण्या पाणी
भरोणी अर्ध्या बादलीला
फिरती माघारी दिसली फणी
४. येता प्रसंग वाका
मारती बाबांना हाका
घ्या दुसरी भरोणी
म्हणे पाय घसरला का ?
५. शिखऱ्यांची मंडळी
बाबांना विणवण्या करी
यांना लावा मुंबई
पोरांना मिळेना भाकरी
६. श्री म्हणे शिखऱ्यांना
उद्याच निघा मुंबईला
शिखऱ्यांचा ऐकोणी ना
बाबांनी घातले शिव्याला
७. दिले पन्नास पन्नास
पैसे श्रीने प्रत्येकाला
श्रींच्या प्रसादे पन्नास पैसे
रूपांतरले पाच लाखाला
८. डाळमोडीचे दशरथ रायते कामा
येतसे श्रींच्या सांगण्यावरूनी
मिळवला कृपाशिर्वाद तयांनी
बाबांच्या हृदयी जाऊनी
९. बाबा रायत्यांना
जवळी करती
पवार तिकडे
मुख्यमंत्री होती
१०. दशरथ रावतेंना श्री म्हणे
डाळे नाव तुला बरे
रावतेंना न काही कळे
श्री म्हणे तू नुसता हो म्हण रे
११. वदवले डाळेंच्या नव्हे
पवारांच्या मुखातुनी हो
मराठवाडा विद्यापिठाचे झाले
आंबेडकर नामांतर हो
१२. राजीव गांधीचे कॅलेंडर
बाबांना भक्त देती
घेऊनी तयाला हाती
वाळूत पुरायला लावती
1. परतूनी येती दोघे
झाले तयांना माहीती
असतो उपस्थित तर
प्रतिज्ञा आपली मोडती
2. प्रतिज्ञा आपली ती
श्रींना कशी माहिती
प्रभूलीले वरी दोघे
असा विचार करती
3. असा तो श्रीहरी
भक्तांच्या प्रतिज्ञा पाळी
यशवंत हो जयवंत हो मुखी
हाती वाजवावी टाळी
4. मेळा सर्व गुरुजनांचा
मधल्या सुट्टीत शाळेच्या
आस्वाद घेण्या चहाचा
हॉटेली जातसे सिद्धूच्या
5. गुरुजन सगळे चहा घेई
एस. पी. सर बाबांना देई
ऐसा हा चहादान क्रम
हरदिनी नेमाने होई
6. चहा न घ्यायचा बाबांना
एक दिन ठरविले मनी
तुमचा नको, आमचा घेवू
ऐसी हाक पडली कानी
7. ऐकोणी बाबांच्या शब्दा
घेती थोबाडी मारुणी
हरदिनी श्रींना देण्या चहा
आले मालकाला सांगोणी
8. प्रथम दर्शनी पाहिली भगवंती
साबळे माया सांगती
बाबांना चिंध्या पिऱ्या
सौ. तयाची म्हणती
कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरी पोर्णिमा असेही म्हणतात . या दिवशी दिवाळी प्रमाणे वास्तूमध्ये, अंगणात , मंदिरात, पवित्र ठिकाणी दिवे लावतात. दीपमाळ प्रज्वलित करतात. दीपदान करतात . गंगास्नान करतात . मंदिरा समोरील उंच दगडी दीपमाळेतील सर्व दिवे पाजळतात . श्री क्षेत्र कुरोली सिध्धेश्वरातील सर्व भाविक भक्त कार्तिक पौर्णिमेच्या अगोदर एक महिना उपवास करतात . उपवासाचा समारोप म्हणजे कार्तिक पोर्णिमास रात्रीचा जागर, पहाटेची काकड आरती, सकाळची, दुपारची, संध्याकाळची आरती , भजन, कीर्तन, प्रवचन, इ. मध्ये भक्तांना महिनाभर भक्तीच्या गंगेत डुबता येते. कुरोलीतील शिवमंदिर हे शिवकालीन व जागृत तीर्थक्षेत्र आहे. या शिवमंदिराच्या शिवलींगातून आजही शिवानाद घुमत असतो . शिवानाद ऐकणे म्हणजे लाखो भक्तांच्या आनंदाला उधान येणे . सर्वत्र भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी दिपोस्तव साजरा करतात.
देशभरातील सर्व शिवमंदिरात हर हर महादेव अशी हाळी, दिपोस्तवाची दिवाळी आणि भक्तांची मांदियाळी म्हणजे कार्तिक पोर्णिमा . श्री यशवंत बाबा कुरोलीत रमले. सुर्यातेजाला गोणपाटात किती दिवस झाकायचे असा प्रश्न देवदेवतांना पडला. श्री समर्थ सद्गुरु गजानन महाराजांना (शेगाव) राहवले नाही. न भूतो न भविष्यती अशी भव्य पायी दिंडी प्रथमच व एकदाच कुरोलीत आली . सिद्धेश्वराच्या प्रशस्त, पवित्र परिसरात मुक्काम थाटला . दुसऱ्या दिवशी दिंडी पुढे मार्गक्रमण होण्याचा व कुरोलीत सिद्धेश्वर यात्रेचा दिवस अर्थात कार्तिक पौर्णिमेचा होता. यात्रेमुळे गावकरी, वारकरी, पंचक्रोशीतील भाविक भक्तांची मुंग्यांप्रमाणे गर्दी झाली होती . सर्वसाधारण दहा हजार भाविकांचा जनसमुदाय जमला होता . साखर विस्कटल्याप्रमाणे माणसेच माणसे होती .
दिंडीच्या नित्य प्रथेनुसार भला मोठा पुष्पहार हत्तीच्या सोंडेत दिला. हत्ती संथ गतीने गर्दीतून वाकडी वाट करून पुढे सरसावू लागला. माहुताला हत्तीला रोखणे अवघड झाले. बाबा स्टॅंडच्या दगडी कठड्यावर एखाद्या महाराजाप्रमाणे ऐटीत बसले होते. गजराज गजगतीने बाबांच्या पुढ्यात आला. सोंडेतील पुष्पहार बाबांच्या गळ्यात घातला.पुढचे गुडघे टेकवले व नतमस्तक झाला. सोंडेने श्री चरणांना विळखा घातला. उठून प्रणाम केला.
सर्व जनसमुदाय आवाक झाला. डोळयांचे पारणे फिटले. ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट व्हावा तसा टाळ्यांचाही कडकडाट झाला. सर्व आसमंत बाबांच्या जयघोषाने दुमदुमला. सर्वांनी बाबांना हात जोडून प्रणाम केला.
यावर श्री महाराज गजराजास उद्गारले- " का रे बाबा, आम्ही इतक्या दिवस झाकून ठेवलेले क्षणार्धात उघडे केलेस. "
श्री महाराज हे चिंध्याधारी देह धारण करणारे भगवंत आहेत हे लोकांनी जाणले . याला जनता जनार्दनाची साथ होती . सुर्यनारायनाची साक्ष होती . यशवंत नारायणाची उपस्थिती होती . श्री यशवंत नारायणाने विश्वकल्याणार्थ मांडलेल्या अखंड पारायणाचा हा श्री गणेशा होता . अर्थातच कार्तिक पौर्णिमा म्हणजेच श्री यशवंत बाबांचा प्रकटदिन . या प्रकटदिनी श्री महाराजांच्या संजीबन समाधीवर पुष्पवृष्टी होते . महाआरती, महाप्रसाद, चहाप्रसाद, भजन, कीर्तन, इ. लाभ घडतो. अन्न, वस्त्र, निवारा, स्नान अशा मानवाच्या कोणत्याच गरजा श्री महाराजांच्या गरजा नव्हत्या . अशा स्वयंभू श्री यशवंताच्या प्रकाटदिन सोहळ्यास आपले येणे घडो .
कार्यक्रमाचे दिनी काढलेल्या काही फोटो इथे आम्ही प्रदर्शित केल्या आहेत, जरी आपणाला या संकेतस्थळावर काही फोटो प्रदर्शित करावयाच्या असतील तर आम्हाला info@@yashwantbaba.org या email वर पाठवाव्यात.
जयाचा जागी जन्म कार्यार्थ झाला ! जयाने सदा वास कार्यार्थ केला ! परी ब्रम्हानंदी लीन दयामुर्ती ! नमस्कार सदगुरु श्री यशवंत मूर्ती !!
सर्व बाबा भक्तांना कळविण्यास आनंद होतो की आपले सदगुरू "श्री यशवंत बाबा " यांचा प्रकटदिन भव्य स्वरूपात साजरा करण्याचे नियोजन आश्रम ट्रस्टने केलेले आहे. असंख्य बाबा भक्तांच्या इच्छेनुसार सदर दिवशी प्रकट दिनाचे औचित्य साधून प्रत्यक्ष "गजराज " माळावर येणार आहेत. ज्या पध्दतीने आपण आश्रमात "पौर्णिमा पालखी सोहळा " उत्सव साजरा करतो, अगदी त्याच पध्दतीने प्रकट दिन सोहळा देखील साजरा करणार आहोत. "श्री " महाराजांच्या समाधी मंदिरा भोवती पालखी परिक्रमा "गजराजाच्या "समवेत करणार आहोत. तद्नंतर किर्तनाचा कार्यक्रम होईल. गजराज "श्री " महाराजांना पुष्पहार अर्पण करणार आहोत. या पवित्र प्रकटीकरणाच्या दिवशी हत्तीने बाबांच्या पालखीस पुष्पहार घालण्याचा सुवर्णमय क्षण पहाण्याचे भाग्य आपणास लाभणार आहे.या दुग्धशर्करायोग दर्शनास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. या दिवशी किर्तन, भजन , चहाप्रसाद, महाप्रसाद इ .लाभ होणार आहे. तरी समस्त भक्तगणांनी सदर दिवशी ९. ०० वाजता उपस्थित रहावे ही नम्र विनंती.
आपले नम्र
यशवंत हो जयवंत हो आश्रम ट्रस्ट
कुरोली सिध्देश्वर
गुरु रे गुरु सद्गुरु , माझा अंत नको पाहू !
तू सगुणरुप दाऊ, तुझे दर्शन कसे घेऊ !! धृ !!
क्षणाक्षणाला आठवण तुझी ! हे कसे तुला सांगू !
जन्मामागूनी जन्म घेऊनी ! मी कुठे तुला शोधू !
तू सगुणरुप दाऊ, तुझे दर्शन कसे घेऊ !! धृ !!
ताल सुरांचा गंध मजला ! गीत कसे गाऊ !
भक्ती पुष्प हे जाती सुकुनी ! चरणी कसे वाहू !!
तू सगुणरुप दाऊ, तुझे दर्शन कसे घेऊ !! धृ !!
अथांग माझी, अबोल भक्ती ! कशी तुला दाऊ !
एकच मनिषा यशवंत माऊली ! चरण तुझे पाहू !
तू सगुणरुप दाऊ, तुझे दर्शन कसे घेऊ !! धृ !!
घेवूनी जा मज, यशवंत माऊली ! इथे नको ठेवू !
दिन दयाळा सोडव आता ! माझा अंत नको पाहू !
तू सगुणरुप दाऊ, तुझे दर्शन कसे घेऊ !! धृ !!
जीवंनपणाचे नित्य मरण हे ! सांग कसे पाहू !
मायाजाळी इथे गुंतुंनी ! तुझ्याविणा मी कसा पाहू !
तू सगुणरुप दाऊ, तुझे दर्शन कसे घेऊ !! धृ !!
श्री. एम.एस.जगदाळे (बापू)
मु. पो. बिदाल ता. माण. जि. सातारा .
ज्ञानियाचा सूर्य अवतरळा आकाशी !
एकरूप झालो मी या ज्ञानमय तेजाशी !!
बुडाली रात्र अंधाराची !
अर्पण माझा नमस्कार ! तुझ्याच चरणी भगवंता !
तुच माझ्या हनमुता तुच माझ्या यशवंता !!१!!
ज्ञानीयाचे ज्ञान तु ! आज्ञानियांचे श्रद्धास्थान तू !!
भक्ताची रसाळ भक्ती तू संताचे अमृत अभंग तू !!
अर्पितो भक्तीचे अर्ध्य तुजशी आम्ही आता !
अर्पण माझा नमस्कार तुझ्याच चरणी भगवंता !!२!!
स्मरता रुप तुझे फुटतो बांध माझ्या प्रेमाचा !
श्रद्धेचा मधवृक्ष असा तू शमवितो त्रास देहउन्हाचा !
अनेक धागे संसार दु:खाचे ओवळे !
गवसळा धागा श्रध्दा सुखाचा आता !!
अर्पण माझा नमस्कार ! तुझ्याच चरणी भगवंता !!३!!
छत्र तुझे आम्हा लाभले भुमातेपरी !!
कृपाळले आम्हा सर्वांसी तू देउनि प्रेमछ्त्र !
पैलतिरी जाण्यास तुप्ता आधार एकमात्र !!
संपला देहभान आमुचा !
विलिन जाहलो अंतरंगी आता !
अर्पण माझा नमस्कार ! तुझ्याच चरणी भगवंता !
तुच माझ्या हनमुता तुच माझ्या यशवंता !!४!!
श्री. शेषाद्री नंदकुमार गोडसे वडूज
हृदयात आस तुझी डोळ्यात पाणी ! सदोदित ऐसै व्हावे चक्रपाणी !
अन्य ठायी नकोतोची गुंता ! नमस्कार माझा तुला यशवंता !!१!!
पाहता पाप न डोळे हे शिणले ! करिता पाप न मन हे विटले !
घाव घालुनिया दे मज मुक्तता ! नमस्कार माझा तुला यशवंता !!२!!
अवगुण माझे मला कळो येती ! परि घालविणे न ये माझ्या हात !
सर्व कर्ता तूचि सदगुरु समर्था ! नमस्कार माझा तुला यशवंता !!३!!
कस लावूनिया शुध्द करी सोने ! घाव घालूनिया एक करी मने !
लाविसी उशिर तरी व्यर्थ आता ! नमस्कार माझा तुला यशवंता !!४!!
नको मोक्ष स्वर्ग पैसा मालमत्ता ! मुखी नाम तुझे असो यशवंता !
मरू आम्ही तुझे गीता गाता गाता ! नमस्कार माझा तुला यशवंता !!५!!
जळातून काढता मीन तो तडफडे ! माता न दिसता बाळ जैसा रडे !
धाव होवूनिया पाडसाची माता ! नमस्कार माझा तुला यशवंता !!६!!
मौक्तिकांसी आस जलधारा स्वाती ! चकोरासी ओढ जशी चांद राती !
आस तशी लागू दे रे माझ्या चित्ता ! नमस्कार माझा तुला यशवंता !!७!!
बोलेल वाणी माझी ते व्हावे नाम ! चालेन ती प्रदक्षिणा सत्यधामा !
करेन काम ती पूजा व्हावी तत्वता ! नमस्कार माझा तुला यशवंता !!८!!
तारीख चोवीस परी बुधवार रात्री ! विझविलीस आपुली जीवन ज्योती !
गुरुराज माझा समाधिस्त आता ! नमस्कार माझा तुला यशवंता !!९!!
देह त्यागुनिया समाधिस्त झाला ! का रे माझा इतुका राग तुला आला !
चिर निद्रा कशी लाविली रे आता ! नमस्कार माझा तुला यशवंता !!१०!!
नित्य वाचतील श्लोक कोणी जे लोक ! त्यासी मिळो आचार अ…. पुण्यश्लोक !
वाहिली सारी मी चरणी अहंता ! नमस्कार माझा तुला यशवंता !!११!!