हिंगणकरांचा श्वान तो
हिरवे महाराजा सोबत करी
भक्तांना लावण्या लळा
येतेस हरदिनी माळावरी
गोडसे श्री.सौ,आले
एकदिनी श्री दर्शना
माहती भव्य माळा
माऊली कुठे दिसेना
गणेश मंदिरी विसावण्या
पडलेल्या त्या श्वाना
बोलती सौ बाबा कुठे ?
राजा तू तरी सांग ना ?
एकूणी त्या बोला
राजा तो पुढे निघाला
माकडकीतील झोपडीच्या
उभे केले दाराला
भावपूर्ण श्रध्देने येई
सदगुरु पाया
न जाई कुणाचे
जीवन ते वाया
जाणोनी भविष्य
घेती ठेऊनी श्री
ओळखिले श्रीकृतीला
म्हणे जीव माझा
अपघाता वाचविला
म्हणे श्री शुन्यता पाहूनी
यथेच्छ प्रसाद
मिळेल आपल्याला
देवकर तात्या येई घेऊनी
सत्यनारायण प्रसादाला
देवकर तात्या आन… बाबांची
पडली गाठ बोळाला
काढुनी दिले झोळीतूनी
शिळ्या भाकरीच्या तुकडयाला
नकळत मिटवलो चिंता
आयुष्याच्या भाकरीची
परिस्थितीही सुधारली
कात टाकूनी दारीद्रयाची
जाणोनी भविष्य घेती
ठेऊनी श्री तात्यांच्या गाडीला
ओळखिले तात्यांनी श्रीकृतीला
म्हणे जीव अपघाता वाचविला