गुरु रे गुरु सद्गुरु , माझा अंत नको पाहू !
तू सगुणरुप दाऊ, तुझे दर्शन कसे घेऊ !! धृ !!
क्षणाक्षणाला आठवण तुझी ! हे कसे तुला सांगू !
जन्मामागूनी जन्म घेऊनी ! मी कुठे तुला शोधू !
तू सगुणरुप दाऊ, तुझे दर्शन कसे घेऊ !! धृ !!
ताल सुरांचा गंध मजला ! गीत कसे गाऊ !
भक्ती पुष्प हे जाती सुकुनी ! चरणी कसे वाहू !!
तू सगुणरुप दाऊ, तुझे दर्शन कसे घेऊ !! धृ !!
अथांग माझी, अबोल भक्ती ! कशी तुला दाऊ !
एकच मनिषा यशवंत माऊली ! चरण तुझे पाहू !
तू सगुणरुप दाऊ, तुझे दर्शन कसे घेऊ !! धृ !!
घेवूनी जा मज, यशवंत माऊली ! इथे नको ठेवू !
दिन दयाळा सोडव आता ! माझा अंत नको पाहू !
तू सगुणरुप दाऊ, तुझे दर्शन कसे घेऊ !! धृ !!
जीवंनपणाचे नित्य मरण हे ! सांग कसे पाहू !
मायाजाळी इथे गुंतुंनी ! तुझ्याविणा मी कसा पाहू !
तू सगुणरुप दाऊ, तुझे दर्शन कसे घेऊ !! धृ !!
श्री. एम.एस.जगदाळे (बापू)
मु. पो. बिदाल ता. माण. जि. सातारा .