हृदयात आस तुझी डोळ्यात पाणी ! सदोदित ऐसै व्हावे चक्रपाणी !
अन्य ठायी नकोतोची गुंता ! नमस्कार माझा तुला यशवंता !!१!!
पाहता पाप न डोळे हे शिणले ! करिता पाप न मन हे विटले !
घाव घालुनिया दे मज मुक्तता ! नमस्कार माझा तुला यशवंता !!२!!
अवगुण माझे मला कळो येती ! परि घालविणे न ये माझ्या हात !
सर्व कर्ता तूचि सदगुरु समर्था ! नमस्कार माझा तुला यशवंता !!३!!
कस लावूनिया शुध्द करी सोने ! घाव घालूनिया एक करी मने !
लाविसी उशिर तरी व्यर्थ आता ! नमस्कार माझा तुला यशवंता !!४!!
नको मोक्ष स्वर्ग पैसा मालमत्ता ! मुखी नाम तुझे असो यशवंता !
मरू आम्ही तुझे गीता गाता गाता ! नमस्कार माझा तुला यशवंता !!५!!
जळातून काढता मीन तो तडफडे ! माता न दिसता बाळ जैसा रडे !
धाव होवूनिया पाडसाची माता ! नमस्कार माझा तुला यशवंता !!६!!
मौक्तिकांसी आस जलधारा स्वाती ! चकोरासी ओढ जशी चांद राती !
आस तशी लागू दे रे माझ्या चित्ता ! नमस्कार माझा तुला यशवंता !!७!!
बोलेल वाणी माझी ते व्हावे नाम ! चालेन ती प्रदक्षिणा सत्यधामा !
करेन काम ती पूजा व्हावी तत्वता ! नमस्कार माझा तुला यशवंता !!८!!
तारीख चोवीस परी बुधवार रात्री ! विझविलीस आपुली जीवन ज्योती !
गुरुराज माझा समाधिस्त आता ! नमस्कार माझा तुला यशवंता !!९!!
देह त्यागुनिया समाधिस्त झाला ! का रे माझा इतुका राग तुला आला !
चिर निद्रा कशी लाविली रे आता ! नमस्कार माझा तुला यशवंता !!१०!!
नित्य वाचतील श्लोक कोणी जे लोक ! त्यासी मिळो आचार अ…. पुण्यश्लोक !
वाहिली सारी मी चरणी अहंता ! नमस्कार माझा तुला यशवंता !!११!!