सदगुरू शंकर महाराज म्हणत असत मी आणी माझा गुरु वेगळा नाही. श्री स्वामी समर्थ हा माझ्या गुरुचा जप आहे. त्यांचे नाम घेतले कि मला ते पोहोचले. जो खुदको जाणता है, वो हि मुझे पहचानता है ! हे त्यांचे वचन. स्वामी समर्थांना सदगुरु शंकर महाराज "मालक " म्हणत असत.
सदगुरू श्री शंकर म्हणायचे,' त्या उदबत्तीच्या किंवा सिगारेटच्या धुरातून मी त्र्यलोक्यही भटकून येतो , धुराच्या लहरी तरंगत विश्वभर संचार करीत असतात . श्री शंकर महाराज विश्वभर संचार करत असतात. आज देशात सर्वत्र आणि विदेशातही कित्येक भक्त साधक श्री शंकर महाराजांचं प्रत्यक्ष्य अनुभव दर्शन घेत असतात सिगरेटचा धूर किवा सुगंध अनुभवत असतात.' मी तुमच्या बरोबर चोवीस तास आहे या त्यांच्या वचनाचा ते अनुभव देत असतात. आपली श्रद्धा आपला भाव महत्वाचा | जय शंकर
कर्नाटकातील हिप्परगी गावातील श्री भागवत यांनी शंकर महाराजांचे चरित्र लिहिले. सत्यनारायणाची पूजा घालून महाराजांना उद्घाटनाला बोलविले. शंकर महाराजांनी चरित्राची सर्व पाने सत्यनारायणाचा प्रसाद बांधून संपवली. श्री भागवत नाराज झाले तेव्हा महाराज म्हणाले "जेव्हा दासबोध ज्ञानेश्वरी कमी पडेल तेव्हा माझे चरित्र लिहून काढ " माणसाने आपले धर्मग्रंथ वाचले तर तो सुखी होईल म्हणून महाराज गावोगाव उत्सव सण प्रवचने कीर्तने पारायणे करीत. महाराज कमी बोलून कित्येक वेळा अधिक काम करीत. भक्त संकट मुक्त कसा होईल हा एकमेव ध्यास घेवून शंकर महाराजांनी आपली जीवनयात्रा पूर्ण केली. ढोंगी बुवांना सरळ केले. महिलेची छेड काढणाऱ्या गुंडाला चाबकाने फोडले. नाठाळांचे कर्दनकाळ झाले. भक्ती संगीताच्या तालावर नाचले. भजनात दंग झाले. महाराज भक्ती मार्गावरील एक महान तेजस्वी तारा होऊन गेले. त्यांच्या महान उपदेशाने व कार्याने आज अनेक भक्त प्रेरित झले आहेत. "आम्ही वैकुंठ वासी आलो याच कारणास" या अभंगाच्या ओळी त्याच्या कार्याला समर्पक आहेत.
श्री सदगुरू शंकर महाराज हे उंचीने फार कमी आणि जन्मतः अष्टावक्र व आजानुबाहू होते. त्यांचा उत्साह हा वाखाणण्यासारखा असे. नेहेमी सफेद धोती आणि सफेद शर्ट परिधान करून असत.
खूप वाढलेले केस, दाढी मिशी आणि त्यातून डोकांवणारे अतिशय मोठे पण भेदक डोळे. प्रथमदर्शनी महाराजांचे वागणे एखादया लहान मुलाप्रमाणे वाटे. पण त्यांचे तेज आणि योगसामर्थ्य त्यांच्या चेहेऱ्यावरून ओतप्रोत ओसंडे. लहान मुलांप्रमाणे वागणारे आणि स्वतःला अज्ञानी आणि गांवढळ संबोधणारे महाराज जेव्हा बोलत तेव्हा मात्र बऱ्याबऱ्याची तोंड बंद होत असत.
स्वतःला अशिक्षित म्हणवणारे महाराजांचे जवळजवळ सर्वच भाषांवर प्रभुत्व होते. आलेल्या भक्ताच्या मायबोलीत ते त्याला उत्तर देत. त्यांचे हे प्रभुत्व फक्त भारतीय भाषेवरच नाही पण परदेशी भाषांवरपण होते. आलेल्या रशियन दांपत्याशी महाराजांनी अस्खलीत रशियन भाषेत संवाद साधला होता. हे न सुटलेले कोडे आहे. भगवंतच तो त्याला काय अशक्य!!
अक्कलकोट स्वामी समर्थांना शंकर महाराज आपले गुरु असे संबोधीत. एक आख्याईका इकडे नमूद करावीशी वाटते.
पुण्याच्या डेक्कन कॉलेज मध्ये असणाऱ्या प्रोफेसर भालचंद्र देवांना महाराजाच्या वयाविषयी कुतूहल होते. कारण प्रसंगी ते एका वयोवृद्ध वाटत तर प्रसंगी गब्रू जवानाप्रमाने वागत. एक दिवस धीर करून त्यांनी महाराजांना प्रश्न विचारलाच " महाराज! आपले वय काय असेल हो?" महाराज उत्तरले " अंदाजे १५० वर्षे. मी शनिवारवाडयात पेशव्यांबरोबर पंगतीला बसलो आहे " ही घटना साधारण १९३५ ची आहे म्हणजे महारांजानी जेव्हा महासमाधी (१९४७) घेतली त्या वेळेस ते १६२ वर्षांचे होते.
पुण्याच्या डॉक्टर ग्यानेश्वर ह्यांना असेच महाराजांच्या वयाबद्दल संदेह होता. त्यांनी महाराजांची परवानगी घेऊन त्यांच्या काही मेडिकल टेस्ट करून घेतल्या. त्या टेस्टचा रिझल्ट आल्यावर डॉक्टराना भोवळ आली. रिझल्ट मध्ये महाराजांचे वय १५२ वर्षे आले.
महाराज वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावानी प्रसिद्ध आहेत. सातपुड्यात सुपड्या बाबा, खानदेशात कुर्वास्वामी, वाघोद मध्ये गौरीशंकर, मध्यप्रदेशात लाहिरी बाबा. एवढेच काय पण परदेशात पण ते प्रसिद्ध आहेत. जपानमध्ये महाराजांचे असंख्य भक्त आहेत.
कैक करिती मनी हा विचार
शंकर महाराज काय हा प्रकार
स्वानुभव घ्या खुला दरबार
दूर राहून ते नाही कळणार llधृ.ll
भक्ती केली भक्तांनी जैसी
कृपा करतात बाबाही तैसी
गुरुभक्ती ती व्यर्थ न जाणार
दूर राहून ते नाही कळणार ll१ll
करिता बाबा मदिरा धुम्रपान
शोधिले याचे लोकांनी कारण
ज्यांनी केले विषाचे प्राशन
त्यांना मदिरा ती काय बाधणार ll२ll
ज्याला दिली बाबांनी दिव्य दृष्टी
त्याला दिसतात ते समाधीवरती
गुरुभक्तीवीन नाही कळणार
अनुभव ज्याला त्यालाच मिळणार ll३ll
भक्तांना नित्य अनुभव येतात
बाबा नाना रुपात भेटतात
श्रद्धा भक्तिविना नाही कळणार
दूर राहून ते नाही कळणार ll४ll
मागावे काय आम्ही सदगुरूंना
सर्व ठावे ते माझ्या शंकराला
गुरुभक्तांचा गुरुचरणी भार
बाबा घेतील त्यांचा कैवार ll५ll
🌼|| शिव चिदंबर ||🌼
!! श्री स्वामी समर्थ !!
!! जय शंकर !!